भुसावळातील लेंडी पुर्‍यात व्यापार्‍यावर चाकूहल्ला

0

भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील लेंडी पुरा भागातील किराणा व्यावसायीक असलेल्या 52 वर्षीय व्यापार्‍यावर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या आरोपींनी चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी व्यापार्‍यास गोदावरीत उपचारार्थ हलवण्यात आले आहे. व्यापार्‍याच्या तोंडावर, कानावर व डोळ्यावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.