भुसावळ- शहरातील खडका चौफुली, दरगाजवळील पेट्रोल पंपाजवळील रहिवासी सीमा जुवानसिंग वास्कले (32) या 8 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून निघून गेल्या आहेत. सर्वत्र शोध घेवूनही त्या न आढळल्याने तालुका पोलिसात हरवल्याची खबर दाखल करण्यात आली आहे. उंची 5 फूट, रंग गोरा, चेहरा उभट, नाक बस्के, डाव्या हातावर सीमा व गोपाळ लिहिले असून अंगात निळ्या रंगाची साडी आहे. महिलेबाबत ओळख पटत असल्यास तालुका पोलिसांशी (02582-242199) वर संपर्क साधावा, असे आवाहन तपासाधिकारी पोलीस नाईक प्रेमचंद सपकाळे यांनी केले आहे.