भुसावळातील विवाहितेचा दोन लाखांसाठी छळ : पतीसह तिघांविरोधात गुन्हा

Harassment Of Married woman in Bhusawal For Two Lakhs : Crime Against Husband And Three भुसावळ : शहरातील विवाहितेने माहेरून दोन लाख रुपये न आणल्याने सासरच्यांनी मारहाण करीत छळ केला. छळ असह्य झाल्याने विवाहितेने माहेर गाठून या प्रकरणी मंगळवारी बाजारपेठ पोलिसात तक्रार दिल्याने पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनगडच्या आरोपींविरोधात भुसावळात गुन्हा
रुकय्या साजीद बागवान (इस्लामपूरा मशीदजवळ, सोनगड, जि.वापी, ह.मु.जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार 1 मार्च 2014 ते 4 जुलै 2022 दरम्यान सासरच्यांनी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून छळ करण्यात आला तसेच विवाहितेला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून साजीद रहिम बागवान, फर्जाना रहिम बागवान, रहिम युसूफ बागवान (ईस्लामपूरा मशीदजवळ, सोनगड, जि.वापी) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.