भुसावळातील वृत्तपत्र वाटणार्‍यांची ‘दिवाळी झाली गोड’

0

विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी केला गौरव

भुसावळ- ऊन, वारा, पाऊस याची बाराही महिना तमा न बाळगता वाचकांपर्यंत भल्या पहाटे वृत्तपत्र वाटणार्‍या तरुणांना दिवाळीनिमित्त ड्रेस , साडी व मिठाईचा बॉक्स देण्याचा स्तुत्य उपक्रम शहरातील विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी यांनी राबवला. कुटुंबातील सुख-दुःखाचे क्षण बाजूला सारून भल्या पहाटे जगातील घडामोडी वृत्तपत्राद्वारे पोहोचवण्याची मोठी जवाबदारी वृत्तपत्र वाटणार्‍या बांधवांची असते तर या लोकांची दिवाळीही गोड व्हावी या उदात्त भावनेतून निमाणी यांनी सुमारे 50 वृत्तपत्र वाटप करणार्‍या तरुणांना ड्रेस मटेरीयचे कापड, कुटुंबातील सदस्यांसाठी साडी तसेच मिठाईचा बॉक्स सप्रेम भेट देत दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

यांची होती उपस्थिती
या छोटेखानी कार्यक्रमास विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवी निमाणी, भुसावळ जनशक्ती विभागीय कार्यालयाचे प्रमुख गणेश वाघ, दिव्य मराठी भुसावळ विभागीय कार्यालयाचे प्रमुख हेमंत जोशी, रीपोर्टर श्रीकांत सराफ, वितरक शिरीष जोशी, दाऊदी आदींची उपस्थिती होती.

दुसर्‍याच्या चेहर्‍यावरील आनंदाइतके समाधान नाही -रवी निमाणी
दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्याइतके समाधान आयुष्यात दुसरे नाही. कुटुंबातील सुख-दुःख बाजूला सारून वर्षभरात प्रामाणिकपणे वाचकापर्यंत वेळीच अंक पोहोचणार्‍या तरुणांचा छोटीशी भेट आपल्या परीने देण्यात आल्याची नम्र भावना रवी निमाणी यांनी व्यक्त केली.