रेल्वे सरव्यवस्थापकांचे आश्वासन ; आमदार संजय सावकारे यांची बंदद्वार चर्चा
भुसावळ- भुसावळातील वॅगन फॅक्टरीत स्थानिक कुशल, अकुशल कामगारांना रोजगार द्यावा तसेच अकोल्यासह खंडव्याकडून येणार्या गाड्या बायपास जात असल्याने त्यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा यासह अनेक मागण्यांविषयी आमदार संजय सावकारे यांनी रेल्वेचे सरव्यवस्थापक डी.के.शर्मा यांच्याशी चर्चा केली. प्रसंगी मागण्यांबाबत सकारात्मक दखल घेण्याचे आश्वासन शर्मा यांनी दिली. बुधवारी भुसावळ विभागाच्या दौर्यावर शर्मा आल्यानंतर आमदारांनी त्यांची भेट घेत बंदद्वार चर्चाही केली. याप्रसंगी 17064 सिकंदराबाद-मनमाड गाडी लवकरच भुसावळहुन सुरू होणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले तसेच भुसावळातील नवीन आयुबी बोगद्यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. प्रसंगी डीआरएम आर.के.यादव, व्यापारी नितीन सुराणा उपस्थित होते.