भुसावळ- शहरातील वेडीमाता ज्येष्ठ नागरीक संघातर्फे नुकताच वारकर्यांचा सन्मान करण्यात आला. भुसावळ हायस्कूलमध्ये संघाची दत्तात्रय नथू ढाके यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. जीवराम चौधरी यांनी प्रसंगी भगवत गीतेचे वाचन केले. प्रसंगी विजय भोळे, दशरथ पाचपांडे, अशोक पाटील व प्रल्हाद आनंदा बोंडे या सदस्यांचे वाढदिवस साजरे करण्यात आले.
वारीहून परतणार्या भाविकांचा गौरव
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाच्या दर्शन घेवून परतणारे वारकरी देवराम इंगळे, वसंत भोळे, अशोक पाटील, मेघश्याम फालक गुरूजी यांचा संघातर्फे सन्मान करण्यात आला. वारकरी आपले वारीतील अनुभव कथन करताना त्यांच्या डोळ्यातून नकळत आनंदाळू तरळले. बैठकीत श्रावण मासानिमित्त घृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, सप्तश्रृंगीमाता दर्शन सहलीचे नियोजन करण्यात आले. सूत्रसंचालन मेघशाम फालक तर आभार भागवत सपकाळे यांनी मानले. दशरथ पाचपांडे यांनी अल्पोहाराची व्यवस्था केली. पसायदानाने सभेची सांगता करण्यात आली.