मुंबईतील पथक दप्तर घेऊन पोहोचले जळगावच्या पुरवठा विभागात
भुसावळ :- स्वस्त धान्यातील ‘मापाच्या पाप प्रकरणी’ गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने रविवारी रात्री उशिराच यावल रोडवरील शासकीय धान्य गोदामाला सील ठोकत महत्त्वाचे दप्तर ताब्यात घेतले. सोमवारी हे पथक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात काही कागदपत्रांची माहिती जाणून घेण्यासाठी गेल्याचे समजते.
जिल्ह्यातील पाचवे गोदाम झाले सील
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, मुक्ताईनगर, पारोळा, भडगाव या चार गोदामांना रविवारी व सोमवारी पथकाने सील ठोकून दप्तर दप्तर घेतल्यानंतर रविवारी रात्रीच भुसावळचेही गोदाम सील झाल्याने जिल्ह्यातील सील झालेल्या गोदामांची संख्या आता पाच झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार धरणगाव, बोदवड, पाचोरा, अमळनेर येथेही दिवसभरात गोदाम सील केले जाणार असल्याची शक्यता आहे.