घटनेचे कारण गुलदस्त्यात ; पोलिसांकडून गुन्ह्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न
भुसावळ- शहरातील शिवाजी नगरातील एस.के.ऑईल मिलजवळील रहिवासी असलेल्या शेख असलम यांच्या घराबाहेर रक्ताचे डाग पडल्याची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पहाटेवेच्या एखाद्या कुटुंबात झालेल्या कौटुंबिक वादातून ही घटना घडली की लुटीच्या प्रयत्नात प्रतिकार करणार्यावर संशयीतांनी हल्ला केल्याने ही घटना घडली? याबाबत नेमकी माहिती मिळू शकली नाही. बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार, एएसआय अंबादास पाथरवट यांच्यासह बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळापासून सुमारे 200 मिटरपर्यंत रक्ताचे डाग पोलिसांना आढळल्याने पोलिसांनी त्या जागेवर खडूने मार्किंग केले आहे. घटनेचा उलगडा लवकरच होईल, असे निरीक्षक देविदास पवार म्हणाले.