भुसावळातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात पुन्हा अतिक्रमण

0

भुसावळ- शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात राजाश्रयाने पुन्हा बेकायदेशीररीत्या पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाकडे भुसावळ नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी व नगराध्यक्षांनी कानाडोळा करून पाठ फिरवलेली आहे. हे अतिक्रमण कायदेशीर असल्यास त्याचा खुलासा मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांनी करावा अन्यथा हे अतिक्रमण त्वरीत काढून टाकावे. 31 मे पर्यंत अतिक्रमण हटवले न गेल्यास राष्ट्रीय दलित पँथरतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय दलित पँथर जिल्हा कार्याध्यक्ष विजय साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.