भुसावळातील श्री जनकल्याणच्या वसुली अधिकार्याचा पोलिसांकडून कसून शोध : आरोपीचे शहरातून पलायन ; लॅण्ड माफिया अंडरग्राऊंड
भुसावळ : शहरातील श्री जनकल्याण अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटीच्या मालकीच्या फेकरी शिवारातील सर्व्हे नंबर 3/4 मधील प्लॉट 1,4,5,व 6 हे संस्थेचे विशेष वसूली अधिकारी रवींद्र गोपाळ धांडे (रा.भुसावळ) यांनी भुसावळ तहसीलदारांचा नावट सही व शिक्का तयार करून विक्री केल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात धांडे व प्लॉट घेणार्या 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, गुन्हा दाखल होताच वसुली अधिकरी धांडे हा शहरातून पसार झाला आहे तर या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारा लॅण्ड माफिया पसार झाल्याची चर्चा आहे.
प्लॉट खरेरीदारांना पोलिसांनी समज देवून सोडले
22 डिसेंबर 2021 ते 27 मार्च 2022 या श्री जनकल्याण पतसंस्थेने कर्जदाराचे बिनशेती खुले बखळ प्लॉट तसेच जागा व स्थावर मिळकत जमिनीचे सातबारा उतार्याचे विभाजन न करता व तुकडा न पाडता विभाजन करून त्यांची परस्पर विक्री केल्याप्रकरणी वसुली अधिकार्यासह दहा खरेदीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी दहा संशयीत खरेदीदारांना शहर पोलिसात बोलावल्यानंतर चौकशी करून जवाब नोंदवण्यात आला शिवाय समजपत्र देवून संबंधिताना सोडण्यात आल्याचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक गजानन पडघाण यांनी सांगितलेे. दरम्यान, वसुली अधिकारी धांडे यांच्यासह या प्रकरणात शहरातील एका लॅण्डमाफियाच्या नावाची चर्चा असून पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असलातरी संशयीत मात्र शहरातून पसार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.