भुसावळ: शहरातील राम मंदिर वॉर्डात खुलेआमपणे सट्टा घेणार्या विनोद घनश्याम बुला (43, न्यू सातारा, कॉसमॉस बँकेजवळ) व संतोष रामकिशन माहेश्वरी (44, राम मंदिर वॉर्ड, भुसावळ) यांना सट्टा खेळताना व खेळवताना रंगेहाथ अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या पथकाने ही कारवाई करीत 10 हजार 810 रुपयांची रोकड जप्त केली. साहिल तडवी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.