भुसावळातील सट्ट्यावर छापा : दोघांना अटक

0

भुसावळ- शहरातील शिवाजी कॉम्प्लेक्स परीसरातील जयराम लॉटरीसमोर सट्टा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलीस पथकाने छापा टाकत दीपक जयराम चेलानी (सिंधी कॉलनी, भुसावळ) व त्याचा पंटर बापु माधव जगताप (रा.गंगाराम प्लॉट संतोषी मंदीराजवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 360 रुपयांची रोकड व जुगाराची साधन जप्त करण्यात आली. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सहा.निरीक्षक मनोज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, नाईक विजय पाटील, विकास सातदिवे आदींनी केली.