भुसावळातील सात घरफोड्या उघड

भुसावळ प्रतिनिधी दि 9

शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन व तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील झालेल्या घरफोड्या उघडकीस आणण्याकामी चार संशयितांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अखेर चौघांनी घरफोड्या केल्याची कबुली दिल्याने भुसावळातील सात घरफोड्या उघडकीस आणून संशयितांकडून सोन्याचे व चांदीचे दागीने मोबाईल फोन, तसेच गॅस सिलेंडर असे एकूण 2,06,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात बाजारपेठ पोलीस स्टेशनला यश आले आहेयाप्रकरणी पोलीस अधिक्षक एस. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे (अतीरीक्त पदभार) यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव सह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घरफोड्या मधील अज्ञात आरोपींचा शोध घेऊन संशयित शेख मुश्ताक शेख अनवर (वय.२३ ) वर्षे, सोहेल शेख अय्युब, (वय १८) वर्षे, आफताफ शेख समीउल्ला (वय २२) वर्षे, जुबेर शेख कमरू (वय २६) वर्षे, तसेच एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेवुन घरफोड्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी संगनमताने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच तालुका पोलीस स्टेशन मधील असलेल्या सात घरफोडी गुन्ह्याची केल्याची कबुली दिली आहे. सदर आरोपीतांकडुन एकुण कि.रू. 2,06,000/- चे सोन्याचे व चांदीचे दागीने मोबाईल फोन, तसेच गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत…

 

सदरील नमुद आरोपीतांना भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली सदर गुन्हयांचा तपास चालू आहे. सदर आरोपींची (ता. १०) पावेतो पोलीस कस्टडी रिमांड वर आहे. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक एस. राजकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे (अतीरीक्त पदभार), पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकाचे सहा.पो.निरी. हरीष भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पो.हे.कॉ. सुनिल जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, महेश चौधरी पो.कॉ. प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, पो.अमर अढाळे अशांनी मिळून केली.