भुसावळ- शहरात अमृत योजनेंतर्गत जलकुंभांचे काम प्रगती पथावर असतानाच शनिवारी शहरातील प्रभाग 20 सिंधी कॉलनी भागातील नवजीवन हौसिंग सोसायटीजवळ अमृत योजनेच्या जलकुंभाचे भूमिपूजन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले. 11 लाख 50 लीटर क्षमतेचा हा जलकुंभ असून त्यामुळे प्रभाग 19, 20 व 21 मधील सुमारे 17 हजारांवर नागरीकांची तहान भागणार आहे. कार्यक्रमप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, पिंटू ठाकूर, नगरसेविका पुष्पा बतरा, शोभा नेमाडे, रमेश नागराणी, माजी नगरसेवक प्रकाश बतरा आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दिनेश नेमाडे, बाबा हंसकुमार, रमेश अटवानी, मनोहर सोडाई, सुदाम बठेजा, सुनील आगीचा, रमेश आठवाणी, आवतराम आठवनील आदींसह परीसरातील नागरिक उपस्थित होते.