भुसावळातील सुनेकडून सासुचे खून प्रकरण : नातेवाईकांचे नोंदवले जबाब

भुसावळ : शहरातील प.क.कोटेचा हायस्कूलमधील वॉचमन रवींद्र सोनवणे यांच्या पत्नी उज्वला सोनवणे यांनी सासू द्वारकाबाई सोनवणे यांचा कौटुंबिक वादातून विळ्याचे घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात वापरलेला विळा जप्त केला असून संशयीत महिला व मृताच्या नातेवाईकांचे जाब-जबाब नोंदवले जात आहेत.

वादानंतर सासुवर चालवला विळा
बुधवारी सासू-सुनेत वाद झाल्यानंतर सूनेने सासूचा खून केला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी सहा.निरीक्षक गोसावी यांनी संशयीत महिला व मृत महिलेच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी तपास करीत आहे.