भुसावळ- सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे सेंट मेरी प्री-प्रायमरी इंग्लिश स्कुल मधे भुलाबाई महोत्सव साजरा करण्यात आला. मारवाडी समाज मंडळच्या अध्यक्षा भारती राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी विविध स्पर्धा झाल्या. भारती राठी म्हणाल्या की, भुलाबाई महोत्सवाचे ऐकून आनंद झाला कारण आजची पिढी हे सर्व विसरत चालली आहे. आपली संस्कृती व परंपरा टीकवण्यासाठी संस्थेची धडपड कौतुकास्पद कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजन -राजश्री नेवे
द्वितीय सत्रात उच्च न्यायालयाच्या अॅड.मेघा प्रशांत वैष्णव यांची प्रमुख उपस्थिती होती. भुसावळ मधे सांकृतिक कार्यक्रम खुप कमी प्रमाणात होतात व त्यात महिला लवकर घराबाहेर पडत नाही. आपली संस्कृती व परंपरा टिकून रहावी व त्याच बरोबर महिलांना ही आपल्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी आपण भुलाबाई महोत्सवाचे आयोजन केले, असे मत संस्थेच्या संस्थापिका राजश्री उमेश नेवे यांनी व्यक्त केले. यावेळी विविध खाद्यपदार्थांच्या विविध वस्तुंचे स्टॉल्सदेखील महिलांनी लावले होते.
विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक अशा-
रांगोळी स्पर्धा- प्रथम- अंकिता राणे, द्वितीय- ममता हरीमकर , तृतीय- संजना इंगळे, पाककला स्पर्धा- प्रथम- वंदना भावसार, द्वितीय- आरती देशपांडे, पुजेची थाळी सजवणे- प्रथम- अंकिता राणे, द्वितयी- संजना इंगळे, स्मरण शक्ती स्पर्धा- प्रथम- अंकिता राणे, द्वितीय- दर्पणा कुलकर्णी, क्विझ कॉण्टेस्ट- प्रथम- कामिनी नेवे व माया चौधरी, द्वितीय- दर्पणा कुलकर्णी व संजना इंगळे.
यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन कामिनी नेवे तर आभार प्रदर्शन प्रतिभा विसपुते यांनी मानले. माया चौधरी, मनिषा कुलकर्णी यांनी परीश्रम घेतले. पूजा लुल्ला, राजेश्री संघमित्रा फाउंडेशनच्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे, राधिका वाणी, भारती वाणी, भाग्यश्री वाणी व भाग्यश्री नेवे हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.