भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे हद्दपार असतानाही आदेशाचे उल्लंघण करून शहरात बेकायदेशीररीत्या प्रवेश करताना प्रशांत ऊर्फ (मुन्ना) संजय चौधरी (28, रा.पंढरीनाथ नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी अटक केली. संशयीत आरोपी नाहाटा महाविद्यालयाजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, एएसआय तस्लीम पठाण, हवालदार संजय भदाणे, संदीप परदेशी, उमाकांत पाटील, कृष्णा देशमुख, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.