गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी 40 हजारांची लाच मागणे भोवले ; जळगाव एसीबीच्या कारवाईने पोलिस दलात खळबळ
भुसावळ : गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी, सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच चारचाकी चालकावर हल्ला प्रकरणातील संशयीत आरोपीवर टॉर्चर न करण्याच्या मागणीसाठी 40 हजारांची लाच मागणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदाराच्या अंगलट आली असून लाच घेताना आरोपी हवालदारास पकडण्यात आल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. छोटू माणिकराव वैद्य (खोटे नगर, जळगाव) असे अटकेतील संशयीत आरोपीचे नाव आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता कल्पना रसवंतीजवळ एसीबीच्या पथकाने सापळा यशस्वी केल्यानंतर आरोपीस भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात गुरुवारी हजर केल्यानंतर आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.