भुसावळातील हाणामारी प्रकरणी आरोपी जाळ्यात

0

भुसावळ : किरकोळ कारणावरून दोन गटात वाद झाल्याने बाजारपेठ पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी एका गुन्ह्यात दिड महिन्यांपासून पसार आरोपी बाजारपेठ पोलिसांनी गुरूवारी अटक केली आहे. सुश्रृत विनोद झोपे (27, रा.श्रीराम नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून अटक
6 जून रोजी दुपारी 1.30 किरकोळ वाद हाणामारीपर्यंत पोहोचला होता व या घटनेत तक्रारदार तुषार अनिल जंजाळे (19, रा.श्रीराम नगर, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार आरोपी सुश्रृत झोपेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी गुरुवारी गंगाराम प्लॉट भागात आल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, किशोर महाजन, रमण सुरळकर, महेश चौधरी, तुषार पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, बंटी कापडणे आदींनी केली.