तांत्रिक कामांसाठी ब्लॉक : पावसामुळे नऊ रेल्वे गाड्यांना विलंब
भुसावळ- भुसावळ येथील रेल्वे यार्डात शुक्रवारी विविध तांत्रिक कामांसाठी 2 तास 20 मिनिटांचा ब्लॉक घेतला जाणार असल्याने भुसावळ जंक्शनवरून सुटणारी भुसावळ-कटनी पॅसेजर सकाळी 9.30 ऐवजी 11 वाजता सोडली जाणार आहे. बी.कॅबिनवर शुक्रवारी काम केले जाणार आहे. त्यामुळे यार्डात शुक्रवारी सकाळी 8.40 ते 11 वाजेपर्यंत रेल्वे प्रशासनाने ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे कटनी पॅसेंजर दीड तास विलंबाने सुटणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशातील मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवेवर परीणाम झाला असून गुरूवारी भुसावळ जंक्शनवर येणार्या 9 गाड्यांना विलंब झाला.