भुसावळातून ग्राईंडर मशीनची चोरी ; आरोपीला अटक

0

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील शिव कॉलनीत मनोज चौधरी यांच्याकडे घराच्या टाईल फिटींगचे काम सुरू असताना अहमद खान नकीर अली (22, रा.श्रीनगर जळगाव रोड, भुसावळ) यांच्या मालकिचे ग्राईंडर मशीन व टाईल्स कापण्याचे मशीन चोरट्यांनी लांबवले होते. या प्रकरणी 13 रोजी रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे साबीरशहा शब्बीरशहा (24, रा.मदीनानगर, ह.मु.मुजा मोहल्ला, जामनेर) यास पंचशील नगर भागातून अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून चार हजार रुपये किंमतीचे दोन्ही मशीन जप्त करण्यात आले. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, बाजारपेठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज नागरुत, सुनील थोरात, कृष्णा देशमुख, नरेंद्र चौधरी, निलेश बाविस्कर, दीपक जाधव, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, योगेश माळी आदींनी ही कारवाई केली.