भुसावळ : शहरातील वरणगाव रोडवरील हॉटेल देवयानी समोरून चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. रविवार, 26 रोजी रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुप विश्वनाथ डंबेलकर (35, विकास कॉलनी, प्रीमीयर हॉटेलमागे, भुसावळ) यांनी वरणगाव रोडवरील हॉटेल देवयानीसमोर त्यांची 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 बी.के.5071) लावली असता चोरट्यांनी रविवारी रात्री 10 ते 11 दरम्यान ती चोरून नेली. या प्रकरणी डंबेलकर यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक तुषार केशव पाटील करीत आहेत.