भुसावळातून चोरलेली चारचाकी सापडली

0

भुसावळ– शहरातील नारायण नगरील भागातील रहिवासी डॉ.विलास कोळी यांची इंडिका (एम.एच.12 एम.एल.6334) ही 2 सप्टेंबर रोजी चोरीला गेली होती. या बाबत शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही गाडी तापी नगरातील वीज कंपनीच्या कार्यालयाजवळ लावण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांना मिळाल्यानंतर गजानन देशमुख, विनोद वीतकर, साहिल तडवी यांनी चारचाकी ताब्यात घेतली.