जळगाव : चोरीच्या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुकूंदा डिगंबर सुरवाडे (प्लॉट नंबर 57, भुसावळ) याच्या ताब्यातून भुसावळातून दोन वर्षांपूर्वी चोरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. संशयीत सुरवाडे यास न्यायालयाकडून गुरनं.235/2021 मध्ये ताब्यात घेण्यात आले असता पोलीस चौकशीत आरोपी भुसावळातील आठवडे बाजार भागातील म्युन्सीपल शाळेच्या पाठीमागून मनोहर मधुकर ठाकूर (दत्तनगर, भुसावळ) यांची दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली शिवाय ही दुचाकी मिलिंद पुंडलिक जोशी (वाघ नगर, जळगाव) यास विक्री केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, हवालदार रमेश चौधरी, गणेश शिरसाळे, मिलिंद सोनवणे, योगेश बारी आदींच्या पथकाने केली.