भुसावळातून दुचाकी लांबवणारे चोरटे गुन्हे शाखेच्या जाळ्यात

0

भुसावळ- भुसावळातून दुचाकी लांबवणार्‍या दिनेश रामलाल धनगर (36, गोजोरे) व नितीन ज्ञानेश्‍वर दांडेकर (30, गोजोरे) यांना जळगाव गुन्हे शाखेने चोपडा येथून अटक केली. आरोपींनी मनोज पाटील यांची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी 4 जुलै रोजी लांबवल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. आरोपींकडून दुचाकी जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुप्रीया देशमुख, मुरलीधर आमोदकर, नुरोद्दिन शेख, नारायण पाटील, महेंद्र पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, सुशील पाटील, सचिन महाजन, प्रवीण हिवराळे, वैशाली महाजन, वहिदा तडवी आदींनी ही कारवाई केली. आरोपींना अधिक तपासासाठी बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.