भुसावळातून दुचाकी लांबवली

0
भुसावळ:- शहरातील मुस्लीम कॉलनी भागातून चोरट्याने 45 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. 1 ते 2 मार्चच्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार अन्वर नवी पिंजारी (मुस्लीम कॉलनी) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.14 जी.आर.2538) अज्ञात चोरट्यांनी लांबवली. तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली  हवालदार अली सत्तारअली करीत आहेत.