भुसावळातून दुचाकी लांबवली

भुसावळ : शहरात वाहन चोरीचे सत्र कायम असून धांडे हॉस्पीटलसमोरून 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याची बाब शुक्रवारी उघड झाली. या प्रकरणी शनिवारी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरी प्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा
तक्रारदार विशाल सुनील सुरवाडे (22, वेल्हाळा, ता.भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार प्रकाश मांगीलाल जाधव यांच्या नावावरील दुचाकी ते स्वतः वापरतात. शहरातील धांडे हॉस्पीटलजवळ त्यांनी होंडा डिलक्स दुचाकी (एम.एच.19 डी.ई.2837) ही 5 रोजी लावली असता सायंकाळी साडेसहा ते नऊ दरम्यान चोरट्यांनी संधी साधून लांबवली. तपास हवालदार सुनील जोशी करीत आहेत.