भुसावळ- शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम असून चोरट्यांची टोळीची मुक्कामी असल्याची भीती व्यक्त होत आहे. शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवरील गणराया विहारातील रहिवासी संजय त्र्यंबक चौधरी यांच्या मालकिची व 15 हजार रुपये किंमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी 13 रोजी लांबवली. चौधरी यांनी घराबाहेर दुचाकी (एम.एच.19 सी.ए.3388) ही लावली असताना चोरट्यांनी ती लांबवली. बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास पोलिस नाईक सुभान तडवी करीत आहेत.