भुसावळ : परीवहन मंत्री अनिल परब यांच्या घोषणेनंतर रविवारपासून परप्रांतीय प्रवाशांना संबंधित राज्यांच्या सीमेवर सोडण्यासाठी एस.टी.बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. भुसावळ आगारातर्फे रविवारनंतर दुसर्या दिवशी सोमवारीदेखील 13 बसेसच्या माध्यमातून सुमारे 288 प्रवाशांना तर मंगळवारी पुन्हा 17 बसेसद्वारे 374 प्रवाशांना मध्यप्रदेशातील चोरवड बॉर्डरवर सोडण्यात आले.
परप्रांतीय प्रवाशांना मोठा दिलासा
रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील जॉली पेट्रोल पंपाजवळून मजल-दरमजल करीत आलेल्या परप्रांतीय मजुरांची नाव नोंदणी करण्यात आल्यानंतर सात बसेसच्या माध्यमातून 154 प्रवाशांना मध्यप्रदेशाजवळील चोरवड बॉर्डरवर सोडण्यात आले होते. त्याचप्रमाणे सोमवारीदेखील दिवसभरात 12 बसेसच्या माध्यमातून सुमारे 264 प्रवासी सोडण्यात आले तसेच मंगळवारीदेखील 17 बसेसच्या माध्यमातून 374 प्रवाशांना मध्यप्रदेशाजवळील चोरवड बॉर्डरजवळ सोडण्यात आले.