भुसावळ : शहरातील युवा संकल्प प्रतिष्ठान चौकातून चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळात चोरट्यांची टोळी सक्रिय
योगेश नरेंद्र बर्हाटे (22, पियुष कॉलनी, भुसावळ) यांची 50 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.यु.5008) ही 28 रोजी चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी बर्हाटे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गणेश चौधरी करीत आहेत.