भुसावळ- रेल्वेच्या ओएचई विभागात वर्कर म्हणून असलेल्या आफ्रिन अ.हमीद कुरेशी (24, आरबीआय 582, हद्दीवाली चाळ, ) या 7 मे रोजी नोकरीला जाते, असे सांगून निघाल्या मात्र घरी न परतल्याने शहर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणी अब्दुल हमीद कुरेशी यांनी शहर पोलिसात खबर दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली. रंगाने गोरी, चेहरा लांब, उंची पाच फुट चार इंच, अंगात काळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लॅगीज असे वर्णन आहे. तपास सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय धनसिंग राठोड करीत आहेत. ओळख पटत असल्यास भुसावळ शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.