भुसावळात अज्ञाताने चारचाकी पेटवली

0

भुसावळ : शहरातील श्रीराम नगरात घराबाहेर लावलेली चारचाकी अज्ञाताने पेटवलेल्या शहरात खळबळ उडाली. ही कार कुणी व कोणत्या कारणाने पेटवली याची माहिती कळू शकली नाही. आगीमुळे कारचे मात्र 50 हजारांचे नुकसान झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. चेतन सोनवणे यांच्या घराबाहेर लावलेली चारचाकी (एम.एच.19 ए.एस.8483) अज्ञाताने पेटवल्यानंतर परीसरातील नागरीकांनी तात्काळ पाण्याचा मारा करत आग विझवली.