भुसावळात अटलजींना श्रध्दांजली

0

भुसावळ प्रतिनिधी । भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना आज भुसावळात सर्वपक्षीय श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

शहरातील आयएमए सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अ. संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे, देवेंद्र वाणी, मनसे जिल्हाध्यक्ष पाठक, काँग्रेसचे माजी आ. निळकंठ फालक,
अजय भोळे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी मान्यवरांनी अटलजींच्या कार्यांचे स्मरण केले.