भुसावळात अनोळखीचा मृतदेह आढळला

भुसावळ : कुजलेल्या अवस्थेत मृतदेह शहरातील वांजोळा रोडवर रविवारी सकाळी आढळल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मयत नेमका कोण व कुठला? त्याचा खून झाला की अन्य कारणाने त्याचा मृत्यू झाला याबाबत ठोस माहिती कळू शकली नाही. मृताचे वय अंदाजे 30 असावे असा अंदाज असून श्वापदांनी मयताच्या शरीराचे लचके तोडल्याचा संशय आहे. केवळ सापळा घटनास्थळी आढल्याने पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला वेग दिला आहे.

शहरात उडाली खळबळ
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वांजोळा रोडवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे अज्ञाताचा मृतदेह पडून असल्याची माहिती यंत्रेणला मिळताच बाजारपेठ निरीक्षक राहुल गायकवाड, किशोर महाजन, विजय नेरकर आदींनी धाव घेतली. मयताचे वय अंदाजे 30 असून त्याचा मृत्यू नेमका कसा झाला व मयत नेमका कोण व कुठला? या बाबी अस्पष्ट आहे. घटनास्थळी कंबरेपासून वरच्या भागापर्यंत केवळ पोलिसांना सापळा आढळला आहे शिवाय मृताची ओळख पटेल अशी कोणतीही बाब तपासात निष्पन्न झालेली नाही.