भुसावळ- शहरातील रेल्वे फिल्टर हाऊस भागातील कवाडे नगराजवळ नदीपात्रात बुडाल्याने 25 ते 30 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला. अनोळखीची ओळख पटू शकली नाही. या प्रकरणी शहर पोलिसात सईद कालू गवळी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.