भुसावळ : भुसावळ बसस्थानकाजवळ 25 ते 30 वर्षीय अनोळखीचा मृतदेह 22 डिसेंबर 2021 रोजी आढळला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. अज्ञात तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसल्याने वारसांनी ओळख पटवावी, असे आवाहन बाजारपेठ पोलिस ठाण्याचे नाईक यासीन सत्तार पिंजारी यांनी केले आहे. मयताचे वय 25 ते 30 वर्ष असून अंगात पांढर्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट, डोक्याचे केस काळे असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास बाजारपेठ ठाण्याचे नाईक यासीन सत्तार पिंजारी (7020309469) वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.