भुसावळात अनोळखी भिकार्‍याचा मृत्यू

0

भुसावळ- शहरातील पापा नगर भागात 51 वर्षीय भिकार्‍याचा अज्ञात कारणाने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी शेख अकील शेख नजीर (रा.भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिली. पापा नगर भागात अज्ञात भिकारी बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी पाहणी करून संबंधित इसमास रुग्णालयात हलवले असता तो मयत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. अनोळखी इसम हा भिकारी असून मिळेल त्या पैशातून आपली उपजिविका भागवत असल्याचे सांगण्यात आले. मृत्यूचे ठोस कारण कळू शकले नसलेतरी आजाराने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. तपास हवालदार युवराज नागरूत करीत आहेत.