भुसावळ : जामनेर रोडवरील पंढरीनाथ नगराजवळ भरधाव दुचाकी एकमेकावर आदळल्याने दुचाकीस्वार जखमी झाला. 1 रोजी रात्री साडेआठ वाजता हा अपघात झाला. या प्रकरणी दुचाकीस्वाराविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार योगेश सुकदेव अवसरमल (30, पंढरीनाथ नगर, भुसावळ) हे दुचाकी (एम.एच.19 डी.एल.9195) ने जात असताना समोरून भरधाव वेगाने येणार्या दुचाकी (एम.एच.19 डी.एच.4827) ने धडक दिल्याने अवसरमल जखमी झाले. या प्रकरणी अवसरमल यांच्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार श्याम जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.