भुसावळात अपघात; दोन जागीच ठार

0

भुसावळ । राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील असलेल्या हॉटेल तनरिका जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार मयतांची ओळख पटविण्याचे काम सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांच्यासह पथक करीत आहे.