भुसावळात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा मोबाईल लंपास

भुसावळ : जळगाव अभियांत्रिकीचा विद्यार्थी व जि.प.शाखा मुक्ताईनगरात नोकरीस असलेल्या तरुणाचा भुसावळ बसस्थानकातून चोरट्याने 16 हजार 500 रुपये किंमतीचा मोबाईल लंपास केला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवार, 14 रोजी सकाळी 7.30 वाजता तक्रारदार गिरीष सूर्यकांत मुनेश्वर (18, समता नगर, भुसावळ) हे भुसावळ बसस्थानकावर आल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांचा महागडा मोबाईल लंपास केला. तपास पोलिस नाईक तुषार के.पाटील करीत आहेत.