शहरासाठी 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी कटीबद्ध -नगराध्यक्ष रमण भोळे
भुसावळ- शहरात राबविण्यता येत असलेल्या अमृत योजनेंतर्गत गडकरी नगरात चौथ्या जलकुंभाचे भूमिपूजन मंगळवारी सकाळी नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष म्हणाले की, आगामी काळात गडकरी नगर भागातील समस्या सुटणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात पाणीप्रश्न जटील बनला होता. पुढील काळात या सर्व भागात 24 तासात पाणीपुरवठा होईल शिवाय नळांना मीटर लावण्याचे नियोजनही असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी प्रभागातील नागरीकांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका मंगला आवटे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे आदींची उपस्थिती होती.
शहरात चार ठिकाणी ‘अमृत’ चे जलकुंभ
शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ तसेच काशी विश्वेश्वर मंदिराजवळ व केरोसीन डेपो, खडका रोडवर अमृत योजनेतील जलकुंभाचे काम सुरू असून मंगळवारपासून चौथ्या जलकुंभाचे काम गडकरी नगर भागात सुरू करण्यात आल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.