भुसावळात अल्पवयीन चिमुकलीशी अश्‍लील चाळे ; आरोपीला अटक

0

भुसावळ- पाच वर्षीय अल्पवयीन चिमुकलीशी अश्‍लील चाळे केल्याप्रकरणी यासीन गफूर गवळी (45, शिवाजी नगर, भुसावळ) या संशयीतास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने अल्पवयीन चिमुकलीशी गैरवर्तन केल्यानंतर पीडीतेने कुटुंबियांना बाब सांगितल्यानंतर बाजारपेठ पोलिसात धाव घेण्यात आली तर आरोपीविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी हा दिव्यांग असल्याचे सांगण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग करीत आहेत.