भुसावळात अल्पवयीन तरुणीवर सामुहिक अत्याचार?

0

भुसावळ । शहरातील सिंधी कॉलनी येथून एका अल्पवयीन तरुणीस चाकूचा धाक दाखवून साकेगाव पुलाजवळ नेऊन सात तरुणांनी सामुहिक अत्याचार केल्याची तक्रार शनिवार 21 रोजी पिडीत तरुणीने पोलीसात केली आहे. एका अल्पवयीन तरुणीला सिंधी कॉलनी परिसरात जवळ चाकूचा धाक दाखवून सात तरुणांनी साकेगाव पुलाजवळ नेऊन अत्याचार केल्याची घटना शनिवारी संध्याकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. याबाबत पिडीत तरुणीने आपल्या नातेवाईकांना सोबत घेवून बाजारपेठ पोलीस स्थानकात येऊन तक्रार दिली आहे. यातील तीन तरुणांची नावे तरुणीने सांगितले असून इतर चार तरुणांची नावे कळू शकली नाहीत. संबंधित तरुणांच्या शोधात पोलीसांनी पथक रवाना केले असून त्यांना ताब्यात घेवून इतर चार तरुणांचा देखील तपास केला जाणार आहे. माहिती कळताच डिवायएसपी निलोत्पल यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात ठाण मांडून तपासाच्या सुचना पथकाला केल्या आहेत.