भुसावळात अल्पवयीन मुलाचा गळफास

0
भुसावळ : शहरातील गणेश कॉलनीतील रहिवासी असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. तेजस अशोक पाटील (12, गणेश कॉलनी, भुसावळ) असे मयत बालकाचे नाव आहे. याबाबत कोणार्क रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी शहर पोलिसात खबर दिली. परीक्षेत मार्क कमी पडल्याचे शल्य वाटून या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. तपास शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.