भुसावळात अवैध गुरे प्रकरण ; तीन संशयीतांना न्यायालयीन कोठडी

0

भुसावळ- शहरातील मिल्लत नगरात कत्तलीच्या हेतूने गुरे आणल्याच्या प्रकरणातील तिन संशयीतांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. बाजारपेठ पोालिस ठाण्याचे निरीक्षक देवीदास पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांचा ताफा नेत 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोहंमद सईद अब्दुल सत्तार यांच्या घराच्या परीसरात सात लाख 60 हजार रूपये किंमतीचे 95 गुरे कोंडलेल्या अवस्थेत होती, त्यांची सुटका केली. त्यांना जळगावच्या गोशाळेत रवाना केले. याप्रकरणी कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या गुरांच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठ पोलिसात पोलिस माणिक सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहंमद सईद अब्दुल सत्तार याला अटक केली होती. त्यानंतर मोबीन शेख अजीज, जहीर खान बाबूलाल खान, शेख आसीफ शेख युसूफ (मिल्लत नगर, भुसावळ) यांना अटक करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्या तिन्ही जणांना मंगळवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन्ही जणांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकरे, सहायक फौजदार अंबादास पाथरवट पुढील तपास करीत आहे.