भुसावळात अष्टभूजा मातेच्या जयघोषात ओढल्या बारागाड्या

भुसावळ : अष्टभूजा देवीच्या यात्रोत्सवानिमित्त शुक्रवारी सायंकाळी सात वाजता जामनेर रोड ते अष्टभुजा देवीच्या मंदिरापर्यत बारागाड्या ओढण्यात आल्या. भगत हर्षल लोखंडे हे होते तर त्यांच्या सोबत निलेश पाटील व विनायक झोपे होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. दरम्यान, कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालखंडानंतर उत्सव साजरे करण्यास परवानगी मिळाल्यानंतर तरुणाईत मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे.

नागरीकांची उसळली गर्दी
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड व सहकारी पोलिस कर्मचार्‍यांनी यांनी चोख बंदोबस्त राखला. दोन वर्षांच्या कालखंडानंतर बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार असल्याने बारागाड्या पाहण्यासाठी शहरातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर भाविक उभे होते. यात महिलांची संख्या अधिक होती.