भुसावळ : वरणगाव रोडवरील लोकमान्य लॉजसमोर अज्ञात अॅपे रीक्षाने धडक दिल्याने आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. असद सिकंदर तडवी (8, रेल्वे बंगला, भुसावळ) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. रस्त्याने पायी चालणार्या असद तडवीला पाठीमागून आलेल्या अज्ञात अॅपेने धडक दिली व याच वेळी जमाव जमल्याने रीक्षा चालकाने बालकाला दवाखान्यात उपचारार्थ नेतो असे सांगुन रीक्षात नेले मात्र काही वेळाने घराजवळ सोडून रीक्षा चालक पसार झाला. दुपारी बालकाची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यास उपचारार्थ हलवले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अज्ञात रीक्षा चालकाचा बाजारपेठ पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.