तीन मंत्र्यांची राहणार उपस्थिती ; पाच दिवस चालणार महोत्सव
भुसावळ- खान्देशच्या सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या सन्मानार्थ व महिला बचत गटाच्या आर्थिक विकासासाठी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पटांगणावर (डी.एस.ग्राऊंड) 8 ते 12 डिसेंबरदरम्यान बहिणाबाई महोत्सव होत आहे. 8 रोजी दुपारी दोन वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, महानंदाच्या अध्यक्षा मंदा खडसे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पहिल्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम
महोत्सवाचा शुभारंभ शनिवार, 8 रोजी दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी खासदार ए.टी.पाटील, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, आमदार चैनसुख संचेती, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार राजूमामा भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार डॉ.सतीश पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील यांच्यासह विविध पदाधिकार्यांची उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर सायंकाळी पाच वाजेपासून निवडक कलाविष्कार सादर केले जातील. महोत्सवासाठी सुमारे 300 हून अधिक बचत गटांनी नोंदणी केली आहे. महोत्सव प्रमुख प्रा.सुनील नेवे यांच्या नियोजनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.