बिरसा मुंडा हे क्रांतीकारीच -नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर
भुसावळ- 9 ऑगस्ट हा दिन क्रांती दिनासोबतच आदिवासी गौरव दिन असून बिरसा मुंडा हे क्रांतीकारीच असल्याचे प्रतिपादन नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी येथे केले. शहरातील दीनदयाल नगरात आदिवासी ठाकूर समाजातर्फे आदिवासी गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. प्रसंगी ठाकूर यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेवक ठाकूर म्हणाले की, बिरसा मुंडा यांनी तत्कालीन ब्रिटीश शासनाला आदिवासींच्या मदतीने शह दिला व आयुष्यभर आदिवासींच्या हक्कासाठी लढत राहिले. या युग पुरूषांचा इतरांनीही आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी हिरामण ठाकूर व उमेश ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.
यांनी घेतले परीश्रम
श्री फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण मिस्त्री उपस्थित होते. सूत्रसंचालन राजकुमार ठाकूर यांनी तर आभार संजय ठाकूर यांनी मानले. विनेाद ठाकूर, जगदीश ठाकूर, प्रमोद ठाकूर, विक्की ठाकूर, सचिन ठाकूर, विकास राखुंडे, राहुल वरणकर, अर्जुन बाविस्कर आदींनी परीश्रम घेतले.