भुसावळात इंग्रजीच्या पेपराला 50 विद्यार्थ्यांची दांडी
भुसावळ- बारावी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाल्यानंतर पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरला 50 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. शहरात सहा केंद्रांवर तीन हजार399 विद्यार्थी इंग्रजी विषयासाठी प्रवीष्ट होते त्यापैकी पन्नास तीन हजार 349 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाचा पेपर दिला. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्या पथकाने डी.एल.हिंदी विद्यालय, पीएसआय स्कूल व के.नारखेडे विद्यालयात भेट देऊन पाहणी केली.